Nigdi : निगडी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी

एमपीसी न्यूज- कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निगडीच्या प्रभाग 15 मध्ये औषध फवारणीचा करण्यात आली.  पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्या तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने निगडी, आकुर्डी प्राधिकरणातील विविध पेठांमधील नर्मदा पार्क, गायत्री एलिगन्स आणि अन्य गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये तसेच पांढारकरनगर, गुरुदेवनगर या नागरी वस्त्यांमध्ये स्वच्छता, औषध फवारणी, धूर फवारणी, कचरा संकलन आणि कचरा विल्हेवाट करण्यात आली.

कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी एकत्र येऊ नये, गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तूंची आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, सर्दी-खोकला-ताप असल्यास घाबरून न जाता त्वरित महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये संपर्क साधला, असे  शर्मिला बाबर आवाहन यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.