Petrol-Diesel Price Hike: ग्राहकांच्या खिशाला झळ, सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Petrol-Diesel Price Hike: Petrol-Diesel price hike for ninth day in a row पेट्रोलच्या दरात 48 पैशांची, तर डिझेलच्या दरात 59 पैशांची वाढ करण्यात आली.

एमपीसी न्यूज- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. सलग नवव्या दिवशी इंधन दरात वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या रोज बदलत्या दराचे धोरण पुन्हा सुरु केले आहे. आज पेट्रोलच्या दरात 48 पैशांची, तर डिझेलच्या दरात 59 पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर 83 रूपयांच्या पुढे गेले आहेत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 62 पैसे आणि 64 पैशांची वाढ करण्यात आली होती.


दिल्लीत पेट्रोलची किंमत 75.78 रुपयांवरुन 76.26 रुपये प्रती लीटर झाली आहे. डिझेलची किंमतही 74.03 रुपयांवरुन 73.39 प्रती लीटर झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 83.17 रूपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर 73.21 रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

तर चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 79.96 रूपये प्रती लीटर आणि 72.69 रूपये, तर कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे 78.10 रूपये प्रती लीटर आणि 70.33 रूपये प्रती लीटरवर पोहोचले आहेत.

मागील 9 दिवसातील पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे दर
दि. 7 जून
पेट्रोल 78.67 Rs
डिझेल 67.55 Rs

दि. 8 जून
पेट्रोल 78.25 Rs
डिझेल 68.11 Rs

दि. 9 जून
पेट्रोल 78.77 Rs
डिझेल 68 65 Rs

दि. 10 जून
पेट्रोल 80.11 Rs
डिझेल 69.03 Rs

दि. 11 जून
पेट्रोल 80.73 Rs
डिझेल 69.62 Rs

दि. 12 जून
पेट्रोल 81.27 Rs
डिझेल 70.17 Rs

दि. 13 जून
पेट्रोल 81.84 Rs
डिझेल 70.71 Rs

दि. 14 जून
पेट्रोल 82.43 Rs
डिझेल 71.31 Rs

दि. 15 जून
पेट्रोल 82.89 Rs
डिझेल 71.86 Rs

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.