Petrol-Diesel Prices Hiked: सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

Petrol-Diesel Prices Hiked: Petrol-diesel price hike for fourth day in a row पुण्यात मंगळवारी पेट्रोलचे प्रति लीटर दर हे 79.79 रुपये इतके होते. बुधवारी तिथे पेट्रोल 80.17 रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे.

एमपीसी न्यूज- कोरोनामुळे बेजार झालेल्या नागरिकांना देशातील तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा हादरा दिला. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी पेट्रोलच्या किंमतीत 40 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात 45 पैसे प्रति लीटरची वाढ झाली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, दिल्लीत पेट्रोल 73 रुपयांवरुन 73.40 रुपये प्रति लीटर इतके झाले आहे. तर डिझेलचा दर 71.17 वरुन 71.62 रुपये लीटर झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुण्यात मंगळवारी पेट्रोलचे प्रति लीटर दर हे 79.79 रुपये इतके होते. बुधवारी तिथे पेट्रोल 80.17 रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे.

संपूर्ण देशात इंधनाचे दर वाढले आहेत. परंतु, स्थानिक कर आणि व्हॅटमुळे राज्याराज्यांमधील दर वेगवेगळे असतील. सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत पेट्रोलमध्ये 2.14 रुपये प्रति लीटर तर डिझेलमध्ये 2.23 रुपये प्रति लीटर महाग झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.