Petrol-Diesel Rates Hike: दरवाढीचा उच्चांक, सलग 12 दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये सरासरी 7 रुपयांनी वाढ

Petrol-Diesel Rate Hike: Petrol-diesel price hikes by Rs 7 on average for 12 consecutive days बुधवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 55 पैशांची तर डिझेलच्या दरात 69 पैशांची वाढ करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या सर्वसामान्य भारतीयांना सलग 12 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी (दि.18) पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पेट्रोलच्या दरात 53 पैसे व डिझेलच्या दरात 64 पैशांनी वाढ झाली आहे. बुधवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत 55 पैशांची तर डिझेलच्या दरात 69 पैशांची वाढ करण्यात आली होती.

पुण्यात पेट्रोलचा आजचा दर 84.38 पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर 73.54 रुपये प्रति लिटर तर, मुंबईत पेट्रोल 84.65 रुपये प्रति लिटर व डिझेल 74.91 रुपये प्रति लिटर. दिल्लीत पेट्रोलचे दर 77 रुपये 81 पैसे, तर डिझेलचे दर 76 रुपये 43 पैसे झाले आहेत.


लॉकडाऊनमुळे महसूल घटला आहे. त्यामुळे इंधन विक्रीतून जास्तीत जास्त कर वसूल करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सलग 12 दिवसांत पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर सरासरी 6.5 ते 7 रुपयांनी वाढवले आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधन दरवाढीबद्दल पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. देशातील सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत असताना इंधन दरात केलेली वाढ अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.