Petrol-Diesel Rate Hikes: इंधनाचा भडका; महिनाभरात डिझेलमध्ये 11.23 तर पेट्रोलमध्ये 9.17 रुपयांची वाढ

Petrol-Diesel Rate Hikes: During the month, diesel prices rose by Rs 11.23 per liter and petrol by Rs 9.17 per liter सरकारी तेल कंपन्यांनी या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ केल्यानंतर रविवारी दरवाढीला विश्रांती दिल्याचे दिसले. विश्रांतीनंतर पुन्हा इंधन दरवाढीला सुरूवात झाली आहे.

एमपीसी न्यूज- पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढतच चालल्याचे दिसत आहे. या महिन्यात सलग 21 दिवसांच्या वाढीनंतर रविवारी (दि.28) इंधन दरात कोणतीच वाढ झाली नव्हती. परंतु, आज (दि.29) दोन्ही इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल 13 पैशांनी तर पेट्रोलमध्ये 5 पैशांची वाढ झाली आहे. मागील 23 दिवसांत डिझेल 11.23 रुपये प्रती लीटर तर पेट्रोलमध्ये प्रती लीटर 9.17 रुपयांची वाढ झाली आहे. पुण्यात आज पेट्रोल 86.91 रुपये प्रती लीटर तर डिझेल 77.36 रुपये प्रती लीटर दराने मिळत आहे. इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून आज विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी या महिन्यात सलग 21 दिवस इंधनाच्या दरात वाढ केल्यानंतर रविवारी दरवाढीला विश्रांती दिल्याचे दिसले. परंतु, आज पुन्हा एकदा दरात वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 80.38 वरुन 80.43 रुपये प्रती लीटर झाले आहे. यात 5 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलही 80.40 रुपयांवरुन 13 पैशांनी वाढून 80.53 रुपये प्रती लीटर इतके झाले आहे.


या महिन्यात डिझेल 11.23 रुपये तर पेट्रोल 9.17 रुपयांनी महाग

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाचे दर घसरलेले आहेत. परंतु, देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्या जागतिक बाजारात क्रूड ऑइलचे भाव 38.49 डॉलर प्रती बॅरल आहेत.

परंतु, पेट्रोल-डिझेलचे दर या महिन्यात वाढतानाच दिसले आहेत. त्यामुळे मागील 23 दिवसांत डिझेल 11.23 रुपये प्रती लीटर तर पेट्रोलमध्ये प्रती लीटर 9.17 रुपयांची वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.