Petrol – Diesel Rates : पेट्रोल, डिझेलचे दर वाढले; पुण्यात पेट्रोल 112 तर डिझेल 94.80 रुपये प्रतिलिटर

एमपीसी न्यूज – इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. पुणे शहरात पेट्रोल 81 तर डिझेल 83 पैसे प्रती लिटर वाढले आहे. त्यामुळे पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये तर डीझेल 94.80 रुपये प्रतिलिटर मिळणार आहे.

ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अली दारूवाला यांनी याबाबत माहिती दिली. पुणे शहरात 23 मार्च रोजी पेट्रोल 111.19 रुपये प्रती लिटर, पॉवर 115.69 रुपये प्रती लिटर, डिझेल 93.97 रुपये प्रती लिटर, सीएनजी 66 रुपये प्रती किलो होते. त्यामध्ये वाढ होऊन शुक्रवारी (दि. 25) पुणे शहरात पेट्रोल 112 रुपये प्रती लिटर, पॉवर 116.52 रुपये प्रती लिटर, डीझेल 94.80 रुपये प्रती लिटर आणि सीएनजी 66 रुपये प्रती लिटर झाले आहे.

पुणे शहरात पेट्रोल, डीझेलचे दर वाढण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका सुरु असताना कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडले होते. तरी देखील निवडणुका असल्यामुळे पेट्रोल, डीझेलचे दर स्थिर ठेवले गेले. निवडणुका संपल्यानंतर काही दिवसातच पुन्हा इंधनाच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ब्रेंट कच्चे तेल 118.87 डॉलर प्रती बॅरल झाले आहे. बुधवारी एकाच दिवसात दोन वेळा पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या किरकोळ विक्री किमतींमध्ये वाढ केली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.