Pune : पेट्रोलने नव्वदी गाठली!

एमपीसी न्यूज – पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच आहे. पेट्रोलच्या दराने आता नव्वदी गाठली असून पेट्रोलचे आजचे पुण्यातील दर 89.89 रुपये प्रति लिटर इतके झाले आहे. तर डिझेलचे दर 77.20 रुपये प्रतिलिटर असणार आहे. तर मावळातील पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली असून 90.14 रुपये प्रतिलिटर रुपये मावळातील नागरिकांना मोजावे लागणार आहे.

सतत वाढणा-या पेट्रोलच्या दराने यावेळेला उच्चांक गाठला आहे. अनेक वेळा आंदोलने, निषेध, करूनही इंधन दरवाढ सुरूच आहे. त्यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.