Corona Vaccine Update : आजपासून अमेरिकेतील नागरिकांना मिळणार कोरोनाची लस

एमपीसी न्यूज : अमेरिकेत (United States) फायझर लसीच्या (Pfizer vaccine) तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आजपासून नागरिकांना ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. लशीच्या 30 लाख डोसेजची पहिली खेप या आठवड्याच्या अखेरपर्यंत सगळ्या राज्यांना पाठवण्यात येणार आहे. 

फायझर कंपनीची कोरोना व्हायरसवरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी अमेरिकेच्या अन्न, औषध प्रशासन विभागाने ही लस सुरक्षित असल्याचं मान्य केलं आहे. खरंतर, मागील गुरुवारीच, अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार पॅनेलवरील फायझर-बायोनोटेकच्या सल्लागार एक्सपर्ट पॅनेलने यावर बैठक घेत हा महत्त्वाचा निर्णय दिला होका. अमेरिकामध्ये सतत वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या घटना रोखण्यासाठी लसीचा तातडीने ​वापराला परवानगी देण्यात आली.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने फायझर-बायोटेक कोविड -19 या लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यामुळे कोरोनाने त्रस्त रुग्णांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निर्णयासाठी घेण्यात आलेल्या एफडीए पॅनेलमध्ये लस सल्लागार, वैज्ञानिक, संसर्गजन्य रोग डॉक्टर आणि तज्ञांचा समावेश होता. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांवर आपत्कालीन परिस्थिती वापरावी असं या पॅनलमध्ये ठरवण्यात आलं आहे.

अमेरिकेत मागच्या आठवड्यामध्ये बुधवारी कोरोनामुळे तीन हजारांहून अधिक मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे आता लस मंजूर झाल्यानंतर, देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रित येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गुरुवारी आठ तासाच्या महत्त्वाच्या बैठकीत एफडीए पॅनेलच्या सदस्यांनी फायझर लसीच्या वापराला पाठिंबा दिला. त्यामुळे ब्रिटन, कॅनडानंतर तात्काळ अमेरिकेतही या लसीच्या वापरास परवानगी देण्यात आली आणि आज या लसीचे डोस नागरिकांना देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.