Phaltan : चार लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीएच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना फलटण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि. 17) केली.

ज्ञानेश्वर अशोक दळवी (वय 33) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एका ३२ वर्षाच्या तक्रारदाराने फिर्याद दिली आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याकरिता आरोपी ज्ञानेश्वर दळवी याने 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 4 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दळवी याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली
सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, संजय साळूंखे, विनोद राजे, विशाल खरात, तुषार भोसले यांनी केली.

HB_POST_END_FTR-A2
You might also like