Chikhli : एस एस पी शिक्षण संस्थेमार्फत फार्मसी महाविद्यालय सुरु 

एमपीसी न्यूज –  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी एस.एस.पी. शिक्षण संस्थेमार्फत सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसी हे महाविद्यालय नेवाळे वस्ती, चिखली येथे सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस.बी. पाटील यांनी दिली. 

या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी बी.फार्मसी’साठी आणि डी.फार्मसी’साठी साठ जागांची मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयाचा डी.टी. ई. कोड क्रमांक 6927 असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पी.एन. साबळे यांनी दिली. या महाविद्यालयास दिल्लीच्या फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांची मान्यता मिळालेली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील विद्यार्थ्यांना फार्मसी पदवी, पदविका संपादन करून या क्षेत्रात करिअर करण्याची संधी असल्याचे एस.बी. पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.