Phase 3 Vaccination : एक मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना लस ; केंद्र सरकारचा निर्णय

एमपीसी न्यूज – देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत आज हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक मे पासून अठरा वर्षांवरील सर्वजण लस घेण्यासाठी पात्र असतील. 

लस उत्पादक कंपन्या महिना उत्पादनाच्या पन्नास टक्के लस केंद्र सरकारला देतील तर, उरलेली पन्नास टक्के लस राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्री करु शकतील असे, केंद्र सरकारने म्हंटले आहे.

_MPC_DIR_MPU_II

देशात सध्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून 45 वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर देशात आता 18 वर्षांवरील सर्वांना लस घेण्यासाठी परवानगी दिली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.