Sangvi Crime News : भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल फोन पळवला

एमपीसी न्यूज – यशदा चौक, पिंपळे सौदागर येथे भरणाऱ्या आठवडे बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी सव्वादहा ते साडेदहा या कालावधीत घडली.

योगेश पंजाबराव पवार (वय 46, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशदा चौक, पिंपळे सौदागर येथील आठवडे बाजारात फिर्यादी भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यांनी त्यांचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवला होता. भाजी खरेदी करताना अज्ञात इसमाने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून सफाईदारपणे चोरट्याने मोबाईल काढून घेतला. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.