-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri News : छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रानुसार  मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावतीकरण करणे कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत. त्यांनी छायाचित्र रहिवास पुराव्यासह जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

206 पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 यादी भागामधील 18 हजार 256  मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. त्यामुळे या प्रस्तावित मतदारांच्या नावाची प्रसिद्धी  मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका या तीनही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत त्यांनी त्यांचे छायाचित्र रहिवास पुराव्यासह 206  पिंपरी विधानसभा मतदार संघाचे कार्यालय डॉ. हेडगेवार भवन, से.नं.26, निगडी प्राधिकरण येथे समक्ष अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे 8 दिवसात जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिका-यांनी केली आहे.

ज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याचेही मतदार नोंदणी अधिकारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn