Photo Feature : कलाकुसर कोळ्याची ! पाहा कोळ्याच्या जाळ्याचे कलात्मक फोटो

एमपीसी न्यूज – विणकाम हे तसं बघायला गेलं तर कलाकुसरीमध्ये मोडणारं कौशल्याचे काम आहे. त्यासाठी बारकावे आणि संयमाचा कस लागतो म्हणूनच त्यातून निर्माण होणा-या वस्तू देखील आकर्षक असतात. पण, कोणतंही कौशल्य शिक्षण न घेता निसर्गात उत्कृष्ट विणकाम करणारा कोणता किटक असेल, तर तो ‘कोळी’ आहे. आणि तो जे जाळं निर्माण करतो ती त्याची उत्कृष्ट कलाकुसर आहे.

आपल्याला नेहमीच कोळ्याच्या जाळ्याबद्दल उत्सुकता असते. आपल्या अन्नाची सोय करण्यासाठी कोळी असे जाळं विणत असतात, त्यात अडकलेले छोटे किटक खाऊन ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्याच जाळ्याचे जवळून काढलेले काही कलात्मक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कोळी शेतक-यांचे मित्र असतात, पिकासाठी हानीकारक असलेल्या अनेक किटकांना ते नष्ट करण्याचे काम करतात. आणि शिकार करण्यासाठी त्यांना हेच जाळं उपयोगी पडते.

ज्येष्ठ वृत्त छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी टिपलेली मोहक कलाकुसर –

                                                                  (1)

                                                                               (2)

(3)

(4)

(5)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.