Photo Feature – Wari with Worry: पंढरीच्या वारीची परंपरा अखंड पण… मास्क आडूनही लपत नाहीय चेहऱ्यावरील चिंता!

Photo Feature - Wari with Worry: The tradition of Pandharpur Wari is intact but ... Anxiety on the face is not hidden even under a mask! पांडुरंगा, तूच आता त्राता...

एमपीसी न्यूज – विठुरायाच्या दर्शनाला  निघालेली माऊलींची पालखी म्हणजे शेकडो वर्षे चालत आलेली एक नुसती वारी नसते ती एक आनंद यात्रा असते. काल मात्र या आनंदयात्रेवर भीती आणि काळजीचे सावट स्पष्ट दिसत होते. तो वैष्णवांचा विराट मेळा नव्हता ते टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन झालेले चेहरे दिसत नव्हते. कपाळी चंदनाचा टिळा होता वारकऱ्यांच्या खास पोशाखात असलेले मोजके मानकरी होते आणि… आणि…सर्वत्र होते फक्त “मास्क “! करोना च्या काळ्या छायेत प्रस्थान तर झाले प्रथा अखंड राहिली पण मास्कच्या आडूनही लपत नव्हती चेहऱ्यावर असलेली चिंता!

सर्व छायाचित्रे – देवदत्त कशाळीकर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.