Phugewadi News: दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पिंपरी युवासेनेकडून अर्थिक मदत

एमपीसी न्यूज – पावसात घर कोसळून नुकसान झालेल्या फुगेवाडीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पिंपरी युवासेनेकडून अर्थिक मदत करण्यात आली. युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मडके कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.

संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार श्रीरंग बारणे, विस्तारक राजेश पळसकर, अनिकेत घुले, शहरप्रमुख सचिन भोसले, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, योगेश बाबर, युवासेना शहरप्रमुख विश्वजित बारणे, अजिंक्य उबाळे, राजेंद्र तरस, माऊली जगताप, रुपेश कदम, प्रतीक्षा घुले, शीला जाधव उपस्थित होते.

फुगेवाडी येथील मडके कुटुंबाचे राहते घर 28 ऑगस्ट 21 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कोसळले. घरामध्ये दुर्घटनेवेळी दोन मुली उपस्थित होते. स्थानिक रहिवासी, पोलीस प्रशासन, अग्निशामक दल, रेस्क्यू टीम यांच्या सहकार्याने घर कोसळत असताना प्रथम एक मुलगी व आईला वाचविण्यात यश आले. अजून काही भाग कोसळल्याने घरात मातीच्या ढिगाऱ्याखाली पौर्णिमा मडके अडकून राहिली होती. तीन तासाच्या अथक प्रयत्नातून तिला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

मध्यमवर्गी असलेल्या मडके कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले. हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे राहते घर क्षणातच नाहीसे झाले. घरात पौर्णिमाचे वडील एकटेच कमवते असून शिपायाची नोकरी करतात. त्यावर उदरनिर्वाह, कुटुंब सावरणे व नवीन घर बांधणे अवघड आहे. मडके कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी पिंपरी युवासेनेतर्फे मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी युवासेना युवा अधिकारी निलेश हाके यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.