Phugewadi News: लोकमान्य टिळक शाळेचे विस्तारीकरण होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फुगेवाडी येथील लोकमान्य टिळक शाळेचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी 2 कोटी 58 लाख रूपये खर्च होणार आहे.

या कामासाठी महापालिकेतर्फे ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. त्यासाठी 3 कोटी 15 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रीयेत आठ ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी एस. टी. इलेक्ट्रीक प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 18.81 टक्के कमी दराने म्हणजेच 2 कोटी 51 लाख रूपये दर सादर केला.

त्यामध्ये रॉयल्टी चार्जेसपोटी 1 लाख 59 हजार रूपये आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 5 लाख 78  हजार रूपये असे एकूण 2 कोटी 58 लाख 73 हजार रूपये खर्च होणार आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.