Pimpri News : पिंपरीगावामध्ये साकारणार फुले दाम्पत्यांचे स्मारक, नगरसेवक संदीप वाघेरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरीगाव येथील आरक्षण क्रमांक 162 मध्ये क्रिडांगण विकसित करण्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा असलेले स्मारक उभारण्यात येणार आहे.

याबाबतीत अधिक माहिती देताना नगरसेवक संदीप वाघेरे म्हणारे की, पिंपरीगावामध्ये फुले दाम्पत्यांचे स्मारक व्हावे अशी ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार सदर विकसित होणार्‍या क्रीडांगणास ‘ग’क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत “ महात्मा ज्योतिबा फुले क्रिडा संकुल ” असे नामकरण करण्यात आले.  तसेच संदीप वाघेरे सावता सेवक ट्रस्ट व पिंपरी वाघेरे ग्रामस्थ यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांचा ब्राँझ धातूचा अर्धपुतळा तयार करण्यात आला आहे.

लवकरच हा पुतळा क्रीडा  संकुल येथे बसविण्यात येणार आहे. पुतळा शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी केला असून कलासंचनालय मुंबई यांची मान्यता देखील देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.