Phursungi Crime News: मदत करणा-या तरुणाला दगडाने केली मारहाण, टोळक्याने कोयत्याने फोडल्या तीन मोटारींच्या काचा

एमपीसी न्यूज – दुचाकी घसरून पडल्यामुळे मोटारीतून उतरून मदत करणाऱ्या तरुणालाच टोळक्याने दगडाने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या मोटारीच्या काचा फोडून परिसरातील इतर दोन मोटारींचे नुकसान केल्याची घटना फरसुंगीतील गंगानगर रिक्षा स्टॅड परिसरात घडली.

_MPC_DIR_MPU_II

सूरज परमेश्वर खरात (वय 19, रा. हडपसर) , आकाश रघुनाथ  यादव (वय 19, रा. आळंदी रस्ता, भोसरी), रोहित राम सुनेवाड (वय 19, रा. गंगानगर, फुरसुंगी)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषीकेश दानवले (वय 26, रा. ढमाळवाडी, हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी ऋषीकेश आणि त्यांचा मावसभाऊ एक जानेवारीला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास मोटारीतून जात होते. त्यावेळी गंगानगर परिसरात सूरजची दुचाकी घसरल्याने तो खाली पडला. त्याला उठविण्यासाठी ऋषीकेशने मदत केली असता, तिन्ही आरोपींनी मिळून त्यांना दगडाने  मारहाण केली.

आरोपींनी त्यांच्याकडीत कोयत्याने ऋषीकेश यांच्या मोटारीच्या काचा फोडून नुकसान केले. त्याशिवाय परिसरातील दोन मोटारींच्या काचा फोडत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. राऊत पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.