Pfizer Vaccine : ‘फायझर’ची लस 95 टक्के प्रभावी, डिसेंबरमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – अमेरिकेतील ‘फायझर’ या औषध कंपनीने कोरोना आजारावरील लस 95 टक्के प्रभावी असल्याचे म्हटले आहे. लस चाचणीबाबतचे अंतिम निष्कर्ष समोर आल्यानंतर कंपनीने ही माहिती दिली आहे. लस मंजुरीसाठी लवकरच कंपनी अर्ज करणार असून मंजुरी मिळाल्यास अमेरिकेत डिसेंबरमध्ये लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

फायझर  कंपनी ही ‘बायोएनटेक’ या जर्मन कंपनीसोबत संयुक्तरीत्या कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. ही कोरोना विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वीच कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्राथमिक निष्कर्ष समोर आले होते. त्यावेळी लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, चाचणीचा अंतिम डेटा आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार असल्याचे म्हटले गेले होते.

_MPC_DIR_MPU_II

‘फायझर’च्या उपलब्ध डेटानुसार ही लस 95 टक्के प्रभावी आहे. सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेली जवळपास दोन कोटी लसीचे डोस उपलब्ध होतील.

अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात लसीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार झाला असून 50 लाख नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार असल्याचे याआधीच कंपनीने स्पष्ट केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.