Pimlpe Gurav: रस्त्यावर उभी केलेली वाहने लाकडी दांडक्याने फोडली

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव परिसरातील कल्पतरु इस्टेट कॉलनीसमोरील रस्त्यावर पार्क केलेल्या तीन वाहनांची अज्ञातांनी तोडफोड केली. बुधवारी (दि. 31) मध्यरात्री ही घटना घडली आहे.

पिंपळेगुरव येथील कल्पतरु इस्टेट कॉलनीतील नागरिकांनी नेहमीप्रमाणे घरासमोर वाहने पार्क केली होती. बुधवारी मध्यरात्री अज्ञात आरोपींनी विनाकारण वाहनांची तोडफोड केली. लाकडी दांडक्याने गाड्यांची तोडफोड केली. वॅगनरसह तीन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. गाड्यांच्या काचा फुटल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, तक्रार द्यायला कोणी आले नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.