Pimple Gurav: कौतुकास्पद; विद्यार्थ्यांना दोनवेळचे घरपोच मोफत जेवण

एमपीसी न्यूज – कोरोना विषानूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील खानावळी, हॉटेल बंद असल्याने शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल होत असल्याने सामाजिक जाणिवेतून चंद्ररंग अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत जेवण दिले जात आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागात राहणा-या विद्यार्थ्यांना रोज दोन वेळेचे जेवण दिले जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अन्नपुर्ण योजनेबाबतची माहिती देताना पिंपळे गुरवच्या नगरसेविका उषा मुंडे म्हणाल्या, कोरोनामुळे परिसरातील खानावळी बंद झाल्या आहेत. हॉटेल देखील बंद आहेत. त्यामुळे बाहेरुन या भागात स्थायिक झालेल्या विद्यार्थ्याच्या जेवणाचे हाल होत होते. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून चंद्ररंग अन्नपूर्णा योजनेमार्फत 10 मार्च पासून विद्यार्थ्यांना घरपोच जेवणाचे बडे पुरविले जात आहेत.

सर्व स्वच्छता राखली जात आहे. 167 लोकांच्या स्टाफमार्फत सकाळी आणि संध्याकाळी 250 विद्यार्थ्यांसाठी जेवन बनविले जात आहे. या योजनेबाबत फेसबूक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे.

वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, सांगवी, नवी सांगवी भागातील सर्व विद्यार्थ्यांना, सांगवी रुग्णालयातील परिचारिका यांना मोफत जेवनाचे डबे दिले जात आहेत. विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाते. त्यानुसार सुनील देवकर, शिवाजी निम्हण यांच्यामार्फत डबे पोहचविण्याचे काम केले जात असल्याचे नगरसेविका मुंडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.