Pimple Gurav : अमृता फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी स्त्री शक्ती पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुणे यांच्यावतीने शनिवारी (दि. 1) पिंपळेगुरव येथे ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळु फुले रंगमंदिरामध्ये शनिवारी सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रियदर्शनी हिंगे, प्राजक्ता खानविलकर, रमा मालखरे, आदिती खोत, ओवी सातपुते आणि लक्ष्मी गालफाडे यांना ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी डेक्कन मॅकेनिकल अण्ड केमिकल इंडिया कंपनीच्या अध्यक्षा प्रभा नातू आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सुधीर गाडे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव पटवर्धन यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.