BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Gurav: उत्तर प्रदेशातील आदिवासी हत्याकांडांच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा

एमपीसी न्यूज – उत्तरप्रदेश सोनभद्र येथील जमिनीच्या वादातून आदिवासी कुटुंबातील दहा जणांची गोळ्या झाडून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ शहरातील आदिवासी बांधवांनी रविवारी (दि. 21)पिंपळेगुरव परिसरात मेणबत्ती मोर्चा काढला.

पिंपळेगुरव परिसरात रविवारी सायंकाळी मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पिंपरी महापालिकेच्या जैव विविधता समितीच्या सभापती उषा मुंडे, बाळासाहेब सुपे, सतिश लेंभे, रामदास गवारी, प्रतिक्षा जोशी, सिता किर्वे, प्रवीण धांडे, श्रीराम लांडे, रामदास आढारी, राहुल बुरुड, अरुण गभाले, संतोष आसवले, तुषार गवारी यांच्यासह आदीवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरसेविका मुंडे म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील, सोनभद्र गावात जमिनीच्या वादातून बुधवारी (दि. 17)आदीवासी कुंटूंबातील दहा जणांची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच तीस लोक गंभीर जखमी झाले आहेत. हत्याकांडातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. हत्याकांडात बळी पडलेल्या नागरिकांच्या कुंटूंबियांना सरकारने मदत करावी. आदीवासांशी बांधवांवरील हल्ले आम्ही कदापी खपवून घेणार नाही.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3