Pimple Gurav Crime News : भटक्या श्वानाला इमारतीवरून फेकून ठार मारल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भटक्या श्वानाला अज्ञातांनी इमारतीवरून खाली फेकून ठार मारले. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. 12) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.

फरीनजहाँ विशाल शेख (वय 23, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी सात महिने वय असलेल्या एका भटक्या श्वानाला सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथील चंद्ररंग कॉर्नर समोर सृष्टी चौकात इमारतीच्या टेरेसवरून खाली फेकून दिले. त्यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अमानवीयतेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.