Pimple Gurav : पणत्यांनी उजळून निघाले श्रीकृष्ण मंदिर

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरवच्या जवळकरनगरमधील श्रीकृष्ण मंदिर परिसर पणत्यांनी उजळून निघाले … निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचे , अर्थात पणती पौर्णिमेचं…या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर आणि श्रीकृष्ण मंदिर महिला मंडळ यांच्या संयुक्तपणे करण्यात आले होते.

मिणमिणत्या पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी पिंपळे गुरवकरांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी काढण्यात आलेली आकर्षक रांगोळीही लक्षवेधी ठरली. हा दीपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. श्रीकृष्णाच्या मूर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली होती. पणत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. दर्शनासाठी आणि पणत्या प्रज्वलित करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’, या काव्यपंक्तीचा प्रत्यय नागरिकांच्या कृतीतून दिसत होता. दीपोत्सवाच्या जोडीलाच आकर्षक रांगोळी रेखाटण्यात आली होती. रांगोळीमुळे दीपोत्सवाला वेगळा आयाम मिळाला.

यावेळी माजी नगरसेविका वैशाली राहुल जवळकर, संगीता बनसोडे, जयश्री गावडे, तेजश्री पन्हाळे, पुष्पा कुपकर, वैशाली दिवानजी, वृषाली देवडीकर, शोभा गावडे, विलसिनी पानसे, सुरेखा बोऱ्हाडे, कविता गडेकर, सीता कल्याणकर, रविना गडेकर, निशा राऊत, आरती चव्हाण आदी महिला उपस्थित होत्या. रांगोळी काढण्यासाठी ओंकार बनसोडे यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.