Pimple gurav: महोत्सवातून आदिवासी संस्कृती इतर समाजाला समजते – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – आदिवासी संस्कृतीमध्ये असणा-या चांगल्या गोष्टी इतर समाजाला देण्याचे कार्य महोत्सवाच्या माध्यमातून होण्यास मदत होईल असे मत, आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले. तसेच आदिवासी बांधवाना जास्तीत-जास्त मदत कशी करता येईल. यासाठी लोकप्रतिधींनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागासवर्गीय कल्याणकारी योजने अंतर्गत शुक्रवार दि.23 ते रविवार दि.25 नोव्हेंबर 2018 दरम्यान आदिवासी संगीत/संस्कृती व खाद्य दर्शन- 2018 या महोत्सवाचे आयोजन पिंपळेगुरव, येथील सृष्टी चौकाजवळील क्रीडांगणाच्या जागेत करण्यात आले. त्याचा उद्घाटन समारंभ त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जैव विविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, नगरसेवक लक्ष्मण उंडे, माजी नगरसदस्या आशा सुपे, माजी नगरसदस्य रामदास बोकड, भाऊसाहेब सुपे यांच्यासह शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य सागर आंगोळकर, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, चंदा लोखंडे, माधवी राजापूरे, शारदा सोनवणे, शंकर जगताप, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मुख्य संयोजक तथा कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, सह्याद्री आदिवासी महिला संघाच्या अध्यक्षा गौरी गोंठे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सुपे, सुदाम मराडे, महेश जगताप, मनीष कुलकर्णी, मधू रणपिसे उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “गावांकडून खूप आदिवासी लोक शहरात येतात. त्यांना तुमचा आधार वाटतो, असाच तुमचा आधार वाटत राहावा आणि आपल्या आदिवासी बांधवाना जास्तीत-जास्त कशी मदत करता येईल. यासाठी लोकप्रतिधींनी प्रयत्न करावे. आदिवासींसाठी शासन खूप मोठ्या प्रमाणात योजना राबवित असते. अशा योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहचविल्या पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतची पुस्तिका शासन दरबारी उपलब्ध आहे. शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच ख-या अर्थाने समाज पुढे जाईल” असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाची सुरूवात आदिवासी शोभायात्रेने झाली. त्यानंतर आदिवासी तारपा नृत्यकला सादर करण्यात आली. तूरनाच नृत्य व शिवसह्याद्री ढोल पथकाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसदस्य भाऊसाहेब सुपे यांनी केले, तर सूत्रसंचलन माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.