Pimple Gurav: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून जगताप कुटुंबियांचे सांत्वन; सव्वा चार लाखाची मदत

Home Minister Anil Deshmukh offers condolences to Jagtap family; A quarter of four lakh help

एमपीसी न्यूज – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (शुक्रवारी) पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्या विराज जगताप याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सरकारच्या वतीने चार लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून या कुटुंबाला देण्यात आला. तसेच दोषींवर कठोर करण्याचे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले.

गेल्या आठवड्यात प्रेम प्रकरणातून झालेल्या खुनी हल्ल्यात विराज जगताप याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली होती.

या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देशमुख यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. विराज जगताप याची आजी सुभद्रा जगताप यांची भेट घेऊन शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल, अशी ग्वाही दिली.

तसेच या केससाठी तुम्ही म्हणाल तो वकील शासनाच्या वतीने देण्यात येईल याची हमी दिली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने चार लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेते नाना काटे, पोलीस आयुक्त संदिप बिष्णोई उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.