Pimple Gurav : राष्ट्रीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत ईश्वरी जपेने पटकाविले रौप्य पदक

एमपीसी न्यूज – अमृतसर येथे झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत किड्स पॅराडाईज स्कूलची किकबॉक्सर ईश्वरी जपे हिने २४ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत रौप्य पदक मिळविले. भारतातून आलेल्या महिला बॉक्सरमध्ये ईश्वरीने महाराष्ट्राचा दबदबा कायम ठेवत तुफानी खेळी केली.

ईश्वरीने पहिल्या फेरीत गुजरातच्या खेळाडूस ९-४ च्या फरकाने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत तेलंगणाच्या खेळाडूस १०-४ च्या फरकाने पराभूत केले व तिसऱ्या फेरीत दिल्लीच्या खेळाडूस ८-२ च्या फरकाने पराभूत केले व  महाराष्ट्राचे नाव रौप्यपदकावर कोरले. ईश्वरी जपेला रौप्यपदक प्रदान करताना रेखा महाजन    (डी. एस.ई. पंजाब मेंबर), राजेश थापा , जसबीर सिंह , सचिन झरे व संदेश साकोरे आदी  उपस्थित होते.
  • ईश्वरी हि किड्स पॅराडाईज स्कूल, चऱ्होली बु. इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत असून संदेश साकोरे सर व चेतन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली किकबॉक्सिंगचा सराव करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे , संचालक नवनाथ काळे,  संचालक सचिन काळे  व प्राचार्य  विद्युत सहारे आदींनी तिचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.