Pimple Gurav : “मेरा लाईफ, मेरा स्वच्छ शहर” मोहिमेस प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका व सामाजिक (Pimple Gurav) संस्थांच्या वतीने “मेरा लाईफ, मेरा स्वच्छ शहर “मोहिमेची सुरुवात पिंपळेगुरव मधील उद्यानात करण्यात आली.

राजमाता जिजाऊ उद्यानामध्ये ड क्षेत्रीय आधिकारी उमाकांत गायवाड,सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव,राहुल जवळकर, अण्णा जोगदंड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली.

आरोग्य आधिकारी महेश आढाव म्हणाले की नागरिकांनी पालिकेत सहकार्य करावे रिड्यूस ,रियूज रिसायकलिंग म्हणजेच कचरा कमी करा, वस्तूचा पुनर्वापर, टाकाऊ पासून नवीन वस्तू तयार करणे हाच पालिकेचा मुख्य उद्देश आहे .या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे.

मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा असा संदेश देणारा पेहराव केला होता.  पर्यावरणाची व या ठिकाणी वस्तू आणून देण्याची नागरिकांना शपथ दिली.

Maval : लग्नाचे आमिष दाखवून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

यावेळी टायर, कपडे, टीव्ही, मोबाईल ,प्लॅस्टिक, पादत्रांने, खेळणी इत्यादी वस्तू सोळा दिवसांमध्ये पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ गार्डनमध्ये  5 जून 2023 पर्यंत आपापल्या वेळेत उद्यानात आणून देण्याचे आवाहन जोगदंड यांनी  केले.

सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी घनकचरा, ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा वेगळा करून पालिकेत सहकार्य करावयाचे सांगितले. आपल्या कडून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे व पालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी यावेळी ड  क्षेत्रीय अधिकारी उमाकांत गायकवाड, क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी महेश आढाव ,आरोग्य निरीक्षक बी. आर. कांबळे , बेसिक्स संस्थाचे वॉर्ड इंचार्ज श्रीराम डोंगरे, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, सा. का. राहुल जवळकर ,मानवी हक्क संरक्षण जागरीतीच्या शहराध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, नवचैतन्य हास्य क्लब, सदिच्छा महिला गट, तसेच सा.का. मुरलीधर दळवी लक्ष्मण दरेकर, शिवाजी निम्हण,  बाळासाहेब देवकर उपस्थित (Pimple Gurav) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.