BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Gurav: राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप यांचा एकत्र फोटो; चर्चेला उधाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांची एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीचा फोटो क्षणार्धात सोशलमिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे याची जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, नगरसेवक नाना काटे, स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी, नगरसेवक शशिकांत कदम, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ उपस्थित होते.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार हे पुत्र आहेत. आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक वर्ष अजित पवार यांच्यासोबत काम केले आहे. पार्थ आज पिंपरी-चिंचवड शहरात प्रचार करत आहेत. नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. शिवजयंती निमित्त शहरातील विविध मंडळांना भेटी देत आहेत. पिंपळेगुरव मधील एका मंडळांच्या भेटीला ते गेले होते. त्याचवेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तेथे दाखल झाले. दोघेही एकाच कार्यक्रमात एकाचवेळी आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. मावळातून उमेदवारी न मिळाल्याने जगताप नाराज आहेत. त्यामुळे एकाचवेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी ठरवून केले की ऐनवेळी झाले याची जोरदार चर्चा शहराच्या राजकारणात रंगू लागली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.