Pimple Gurav News: आदिवासी दिनानिमित्त नगरसेविका उषा मुंडे यांचा सत्कार

Pimple Gurav News: Corporator Usha Munde felicitated on the occasion of Tribal Day आदिवासी समाजातील नगरसेविका उषा मुंडे यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

एमपीसी न्यूज- आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जैव विविधता समितीच्या सभापती उषा मुंडे यांचा रविवारी (दि.9) सत्कार करण्यात आला.

आदिवासी दिनानिमित्त रविवारी पिंपळे गुरव भागात विविध कार्यक्रम घेण्यात आले. आदिवासी समाजातील नगरसेविका उषा मुंडे यांचा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या उपस्थितीत सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. भाजपचे संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे यावेळी उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या संकल्पेनेतून सृष्टी चौकात आदिवासी समाजाकरिता मोठी इमारत उभी राहिली आहे.

त्यांच्यामुळेच माझ्यासारखी आदिवासी समाजातील महिला लोकप्रतिनिधी झाली असल्याची भावना मुंडे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.