Pimple Gurav News: राष्ट्रभाषा परीक्षेत भारतात प्रथम आलेल्या गौतमी निकम हिचा सत्कार

एमपीसी न्यूज – भारतीय संस्था राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सन 2019 घेतलेल्या राष्ट्रभाषा परीक्षेत भारतामध्ये प्रथम आलेल्या गौतमी निकम हिचा नाना काटे सोशल फाऊंडेशन आणि सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

माजी विरोधी पक्षनेते, विद्यमान नगरसेवक नाना काटे, माजी स्वीकृत सदस्य सागर कोकणे यांच्या हस्ते गौतमीचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1936 साली स्थापन केलेली आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणारी अखिल भारतीय संस्था राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धा यांच्या वतीने सन 2019 सत्रामध्ये राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. या परीक्षेमध्ये गौतमी संजय निकम ही विद्यार्थिनी भारतामध्ये सर्वप्रथम आली आहे. त्यामुळे गौतमीचा सत्कार करण्यात आला. तिला पुढील शिक्षणासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन व स्वीकृत सदस्य सागर कोकणे मित्र परिवार यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.