Pimple Gurav News: मराठवाडा जनविकास संघांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम

एमपीसी न्यूज : मराठवाडा जनविकास संघांचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष वृक्षमित्र अरूण पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिकांना विमा स्वरूपात प्रमाणपत्र, सामाजिक संस्था व नागरिकांना 6 ते 8 फूट उंचीचे जाळीसह दोन हजार वृक्ष वाटप, (Pimple Gurav News) एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, बाल आधार कार्ड, विधवांना पेन्शन कार्ड वाटप, अंध अपंगांना शॉप ऍक्ट लायसन वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.

जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबुराव तांदळे महाराज (आळंदीकर), समाजप्रबोधनकार ह.भ.प. शारदाताई मुंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे,स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक नाना काटे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्या हस्ते गरजू नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले.

ITBP Bus Accident : जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून 6 जवान शहीद

यावेळी माजी नगरसेवक राजू लोखंडे, जनार्दन जगताप, माजी नगरसेविका चंदा लोखंडे, दामोदर काशीद, ह.भ.प. विजूअण्णा जगताप, सामाजिक कार्यकर्ते तानाजी जवळकर, बैल गाडामालक सखाराम काशीद, श्याम जगताप, अशोक जगताप, उद्योजक बालाजी पवार, रावसाहेब चौगुले, गणेश जगताप, शशिकांत दुधारे, बुद्धभूषण विहारचे अध्यक्ष पूनाजी रोकडे, सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी,(Pimple Gurav News) महादेव बनसोडे, दत्तात्रय धोंडगे, बळीराम माळी, गोपाळ माळेकर, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, उद्योजक माधव मनोरे, सुनील काकडे, पी.एम.राठोड, मारुती बानेवार, उद्योजक शंकर तांबे, गणेश ढाकणे, सुभाष दराडे, हनुमंत घुगे, सचिन रसाळ, नितीन सोनवणे, नाना तांबारे, प्रदीप गायकवाड, संतोष मोरे, नागेश जाधव, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, भीष्माचार्य जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचे सभासद, पिंपळे गुरव-नवी सांगवी प्रभाग  45 चे अध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष सतिशकुमार चोरमले, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे कार्याध्यक्ष आरिफ सलमानी, सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस निसार शेख, सुनील कदम, पांडुरंग कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विष्णू शेळके यांनी, तर  आभार वामन भरगंडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.