Pimple Gurav News : नाना काटे सोशल फाउंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त अनाथ मुलांना कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू भेट

एमपीसी न्यूज – नाना काटे सोशल फाउंडेशन आणि श्री फाउंडेशनच्या वतीने दिवाळी सणानिमित्त अनाथ मुलांना कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू भेट दिल्या. त्यांच्या मनपसंतीनुसार कपडे खरेदी केले. अनाथांच्या आयुष्यात प्रकाश टाकला. त्यांची दिवाळी प्रकाशमान करण्याचा प्रयत्न फाऊंडेशनने केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

ओम श्री साई मतिमंद अनाथ आश्रमातील 18 वर्षाखालील 100 मुला-मुलींना कपड्यांची खरेदी करुन दिली. मुलांच्या मनपसंतीनुसार काळेवाडी येथील वामन क्लॉथ स्टोअर्समधुन कपडे, व दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करून देण्यात आले. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असलेला दिसून येत होते.

माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे, आश्रमाचे संस्थापक सागर पाडाळे, साद सामजिक संस्थाचे विकास पवार आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.