Pimple Gurav : डेंग्यू पसरण्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – नवी सांगवीतील समतानगरमध्ये साथीच्या आजाराबरोबर, डेंग्यूच्या आजही बळकावत चालला आहे. मलेरिया, डेंग्यू रोगाची आजार पसरण्यापूर्वी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, अनेक नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहेत. समतानगरमधील मनोज जगताप हा तरूण शनिवारपासून औध येथील सास्वत हाँस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.

  • समतानगरच्या पाठीमागे ढोरे फार्म हे खासगी मालकीचे असून त्याठिकाणी फवारणी होणे आवश्यक आहे.डासाचे प्रमाण वाढल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. आरोग्य विभागाने त्या ठिकाणी जाऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आवाहन मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केले आहे.

फोनवरून जोगदंड यांनी आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी फोनवरुन माहीती दिली. तेव्हा त्यांनी लवरात लवकर उपाययोजना करू म्हणून सांगितले. नागरिकांनीही.आपला परिसर स्वच्छ ठेवावा, आठवडयातून एक दिवस कोरडा ठेवावा, पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये. असे आवाहन त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.