Pimple gurav : संगिता जोगदंड यांना राज्यस्तरीय “मानवधिकार” पुरस्कार

एमपीसी न्युज -नवी सांगवीतील मानवधिकार कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना नुकताच जागतिक मानवधिकार दिनानिमित्त पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए.डी.सावंत आणि मानवीहक्कचे अभ्यासक आणि कायदेतज्ज्ञ अँड असीम सऱदे,सुभाष वारे, यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती स्क्रीनवर दाखवण्यात आली. यावेळी जोगदंड आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, आजवर मी वेगवेगळ्या जनजागृती, पथनाटय, वंचितांसाठी काम केले. या कामाची दखल या संस्थेने घेऊन मला हा पुरस्कार प्रदान केला .याचा मला आनंद झाला . यापुढेही मी आधिक जोमाने कार्य करत राहील.माझे पती आन्ना ज़ोगदंड यांच्या सामाजिक कामामुळेच मला घरातुन प्रेरणा मिळाली,असे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या.

यावेळी संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयास हार घालून प्रत्येक जिल्ह्यास्तरावर “विशेष मानवी हक्क न्यायालय,”असावे अशी शासनाने 30 मे 2001 मध्ये कायद्यात तरतूद केली आहे .परंतु 17 वर्षांत अमंलबजावणी झालीले नाही. म्हणून रँली काढून जिल्ह्याधिकारी यांना निवेदन दिले. असे संचालक आन्ना. जोगदंड यांनी सांगितले,त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कार संगीता जोगदंड, कतारसिंग (पंजाब),सूमन जाबुळकर,पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे(राष्ट्रपती पुरस्कारार्थि, सातारा),सुनील सवाशे,(पत्रकारिता) डॉ. आभिषेक हरीदास(शैक्षणिक)ईत्यादी ना गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास,कुचेकर,राष्ट्रीय सचिन सोमनाथ सावंत, संचालक आन्ना जोगदंड, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष सतिश लालबिगे,महाराष्ट्र प्रदेश कायदेशीर सल्लागार अध्यक्ष अँड.सचिन झालटे,मुख्य सल्लागार आनिल कदम,पुणे जिल्हा यूवक अध्यक्ष धनरासिंग चौधरी उपाध्यक्ष विकास शहाणे,महिला अध्यक्षा किर्ती जाधव गूलशन नायकुडे ,संघटण सचिव गजानन धाराशीवकर,,मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महेश भागवत, एस डी विभुते,राजश्री गागरे, नियाज शेख ठाणे जिल्हा अध्यक्ष शकील शेख आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.