Pimple Gurav : चौघांनी मिळून तिघांना शिवीगाळ करत केली मारहाण

एमपीसी न्यूज : पिंपळे गुरवमध्ये (Pimple Gurav) चौघांनी मिळून तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत तिघेही जखमी झाले आहेत. ही घटना 21 जून रोजी घडली.
याबाबत अक्षय पांचाळ (वय 27 वर्षे, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. चेतन पाटील (संपूर्ण नाव पत्ता माहित नाही, रा. नवी सांगवी) व इतर तिघे (नाव पत्ता माहित नाही) हे चार आरोपी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

फिर्यादी हे 21 जून रोजी रात्री 10.30 वा. काळुराम बॅडमिंटन हॉल शेजारील ग्राउंडवर (Pimple Gurav) तेथील मॅनेजमेंटचे काम पाहणारे महेश जाधव (रा. समर्थनगर, नवी सांगवी) यांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे बसलेल्या चेतन पाटील याने फिर्यादीस इकडे ये असा आवाज दिला. तेव्हा फिर्यादी यांचा मित्र कृष्णा पंडित यांनी आरोपीस तू इकडे ये असे उत्तर दिले. याचा मनात राग धरून आरोपी व त्याच्या सोबतचे आणखी तिघांनी फिर्यादीस व त्याचे मित्र कृष्णा पंडित व महेश जाधव यांना शिवीगाळ करून, लाथावबुक्याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जखमी केले आहे. चौघाच्या विरोधात 324, 323, 504 व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.