Pimple Gurav : भंडारा डोंगरावर विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी व्यवस्थापन व संशोधन संस्थेमधील विद्यार्थ्यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर परिसरात ११० रोपांचे संरक्षक जाळीसह वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करण्याची शपथ घेतली. वड, पिंपळ, गुलमोहर,कडूलिंब, चिंच रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

मराठवाडा जनविकास संघ संचलित चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं.चि.शहर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट समिती, सुदवडी ग्रामपंचायत (ता. मावळ) यांच्या संयुक्त विद्यमानाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम भंडारा डोंगर येथे पार पाडला. यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी वृक्षारोपण करून ‘प्रत्येकाने आपल्या वेळातला वेळ काढून आपण लावलेल्या रोपाचे वृक्षात रुपांतर होईपर्यंत त्यांची निगा राखू’, अशी शपथ घेतली.

आयकर विभाग अधिकारी जयसिंग निघोट, सुदवडी ग्रामपंचायत सदस्य रमेश कराळे, उपसरपंच नितीन साठे, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट समितीचे विश्वस्त जगनाथ नाटक पाटील, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब कऱ्हाळे, बाबुराव खेडेकर, नामदेव पवार, शंकर तांबे, सुनील काकडे, मयूर शिंदे, रोहित शिंदे, रणजित साबळे, कांबळे, निकिता यादव, तंजीर पटेल, ओंकार औताडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.