Pimple Gurav : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी (Pimple Gurav) एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 22) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव बस स्टॉप जवळ करण्यात आली.

विपुल अजय चव्हाण (वय 21, रा. काटेपुरम चौक, नवी सांगवी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi : इंद्रायणी नदीत आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव बस स्टॉप जवळ एक तरुण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून विपुल चव्हाण (Pimple Gurav) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी शस्त्र जप्त करून विपुल चव्हाण याला अटक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.