Pimple Gurav : किरकोळ कारणावरून तिघांकडून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तिघांनी तरुणाला लाकडी दांडक्याने व कोयत्याने वार केले आहेत. ही घटना शुक्रवार (दि.18) पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथे घडला.

तायाप्पा मुसा जाधव (वय 19 रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सुरेश पवार (वय 28), रामा पवार (वय 26), शिवा पवार (वय 25) सर्व राहणार पिंपळे गुरव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Khadki : शाळेमध्ये वृक्षरोपण आणि रोपवाटिका तयार करण्याची कार्यशाळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नातेवाईकाला (Pimple Gurav) भेटण्यासाठी पिंपळे गुरव येथे गेले असता आरोपींनी तू ईथे काय करतोस म्हणून लाकडी दांडक्याने व कोयत्याने डोक्यात मारहाण करत जखमी केले. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास करत पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.