Pimple Guruv: उधारीचे पैसे मागितले म्हणून कार वॉश सेंटर चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज – उधारीचे पैसे मागितले म्हणून कार वॉश सेंटर चालकाला चौघांनी (Pimple Guruv)मारहाण केली आहे ही घटना मंगळवारी पिंपळे गुरव येथील एस एस वॉशिंग सेंटर येथे घडली आहे.

याप्रकरणी अनुप अजय सिंग (वय 23 रा कासारवाडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद (Pimple Guruv)दिली आहे. फिर्यादीवरून ॲलेक्स,  कृष्णा व त्यांचे दोन मित्र या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : कला, सामाजिक, सांस्कृतिक  क्षेत्रातील मान्यवरांना  ‘ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया’ 2024  पुरस्कार जाहीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल शेख यांचे पिंपळे गुरव येथे कार वॉशिंग सेंटर आहे. फिर्यादी हे तेथे त्यांची गाडी वॉश ला लावून बसले होते. यावेळी सेंटरवर आरोपी आले त्यांना शेख याने उधारीचे पैसे मागितले.

याचा राग आल्याने आरोपींनी सोहेल शेख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी हे भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना त्यांनाही शिवीगाळ करत आरोपींनी मारहाण करत जखमी केले.  यावरून सांगली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.