Pimple Guruv : सासू व नणंदेच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सासू व नणंद या विवाहितेच्या पोषाख, केस विंचरण्याची पद्धत, राहणीमान यावरून सतत टोमणे देत होत्या. या टोमण्याला कंटाळून विवाहितेने राहत्या (Pimple Guruv)  घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपळे गुरव येथे रविवारी (दि.28) सायंकाळी घडला.

या प्रकरणी मयत विवाहितेच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन नणंदा व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणा-यास उज्ज्वल भवितव्य – विनायक पाचलग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत विवाहित महिलेला मागील पाच ते सहा वर्षांपासून हा त्रास सुरु होता. विवाहिता जशी पुण्याला रहायला आली तसे आरोपींनी घरातील किरकोळ कारणावरून, कपडे घालणे, केस विंचरणे किंवा इतरांशी बोलणे यावरून टोमणे देत मानसीक व शारिरीक त्रास केला.

शिवीगाळ व मारहाण करून तिला आत्महत्या कऱण्यास भाग पाडले ज्यामुळे तिने त्रासाला कंटाळून राहत्या घरी फॅनला ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. अद्याप आरोपीला अटक केली नसून सांगवी पोलीस पुढील तपास करत (Pimple Guruv) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.