Pimple nilakh : दवाखान्याच्या खर्चावरून सावत्र बहिणीला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दवाखान्याच्या खर्चावरून झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून सावत्र भावाने बहिणीला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 1 एप्रिल) च्यादिवशी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.
किरण नारायण भालेराव (वय 25, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मानव युवराज कोळी व इतर पाच जणांच्या विरोधात (Pimple nilakh) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chikhali : खेळताना विहिरीत पडून तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव आणि त्यांच्या पत्नी घरी असताना पत्नीचा सावत्र भाऊ मानव कोळी हा त्याच्या साथीदारांना घेऊन भालेराव यांच्या घरी (Pimple nilakh) आला. भालेराव यांच्या पत्नीच्या दवाखान्याच्या खर्चावरून रविवारी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. त्यावरून मानव कोळी याने भालेराव यांच्या पत्नीला कपडे ठेवण्याच्या लोखंडी स्टॅन्डच्या रॉडने मारहाण केली. तसेच त्याच्या साथीदारांनी भालेराव यांना आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली.  या प्रकरणावर सांगवी पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.