Pimple Nilakh : आघाडीची सत्ता आल्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार – हर्षवर्धन पाटील

एमपीसी न्यूज – येऊ घातलेल्या निवडणुकीत आघाडीची सत्ता आली. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करणार असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी पिंपळेनिलख येथे केले. मावळ लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 24) सायंकाळी साडेपाच वाजता पिंपळेनिलख, भैरवनाथ मंदिरासमोर, पिंपळेनिलख गावठाण येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची जाहिर सभा आयोजित केली होती. त्यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी उमेदवार पार्थ पवार, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, कार्याध्यक्ष गौतम आरकडे, एनएसयूआयचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमीर शेख, आमदार दिलीप सोप्पल, विश्वजीत कदम, प्रशांत शितोळे, आमदार शरद रणपिसे, मयूर कलाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, काँग्रेस अल्पसंख्यांक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नदीम मुजावर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा निरीक्षक घनश्याम शेलार तसेच शहर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, कवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, “निवडणुकीत देशाची हवा बदलली आहे. पिंपरी-चिंचवडकडे मिनी इंडिया म्हणून पाहिले जाते. पण या मिनी इंडियात सत्ताधा-यांनी काहीही आश्वासने पूर्ण केली नाहीत. या निवडणुकीत आघाडीच सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आघाडीची सत्ता आली तर पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधा-यांनी केलेला भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले. सत्तेतून पैसा व पैशांतून सत्ता निर्माण झाली आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधा-यांनी फक्त आरोप-प्रत्यारोप केले पण कोणत्याही योजना आणल्या नाहीत. बांधकामे, एच.ए.चा कामगारांचा प्रश्न कोणतेही काम या सरकारने केले नाही. 2014 मध्ये फसवले गेले. आमच्या सरकारमध्ये नाराजी लोकांच्यापुढे चुकीच्यापध्दतीने मांडली गेली. 2014ला काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान गेले. आणि तीनही आमदार निवडून आले.

या चार पाच वर्षात विकासाची कामे केली नाही. अतिक्रमणे नियमित झाली नाहीत. भ्रष्टाचारमुक्त करु असे सांगितले पण सगळ्यात जास्त भ्रष्टाचार या पाच वर्षात या सत्ताधा-यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पार्थ पवार म्हणाले की, “या निवडणुकीत महाआघाडीच्या सत्तेला आणायच आहे. महाआघाडीला आणयच म्हटल्यावर पहिल्यांदा पंतप्रधान बदलायला हवा. देश बदलायचा असेल तर तुमचे मत महाआघाडीला द्या” 29 मेला गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही असे पार्थ पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.