Pimple Nilakh : कुटुंबियांना मारण्याची धमकी देत विनयभंग; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज- कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. बुधवारी (दि.3) रात्री आठच्या सुमारास पिंपळे निलख परिसरात ही घटना घडली असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

प्रकरणी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर रमेश सरोदे (वय 26, रा. पिंपळे निलख) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही बुधवारी रात्री क्लासला जात असताना आरोपी सागर याने पाठलाग करून तिला अडवले. तिचा हात पकडून विनयभंग केला. तसेच आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान पीडितेचे वडील त्याठिकाणी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली. पीडितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक चैत्राली गवळी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.