Pimple Nilakh News : पिंपळे निलख येथे महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – चालत घरी जात असताना महिलेच्या (Pimple Nilakh News)गळ्यातील 87 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे. हि घटना पिंपळे निलख येथील गणेश नगर परिसरात शनिवारी (दि.18) सायंकाळी घडली.
याप्रकऱणी 54 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार दोन दुचाकी स्वारा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Charholi News : चऱ्होली येथे फुल विक्रेत्यावर गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या उद्यानात चालून घरी परत जात असताना आरोपी (Pimple Nilakh News) दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील 2.6 मिली वजनाचे 87 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. यावरून सांगवी पोलीस चोराचा शोध घेत आहेत.