Pimple Nilakh: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी मैत्री वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून एका तरूणाने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पिंपळे निलख येथे नुकतीच उघडकीस आली.

युवराज चव्हाण (रा. क्रांतीनगर, पिंपळेनिलख), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी मैत्री केली. तसेच ‘तू मला खुप आवडतेस, मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे’, असे अमिष दाखविले. त्यानंतर तिच्या घरात कोणी नसताना आरोपी घरात आला आणि त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.

सांगवी ठाण्याचे फौजदार एम. ए. निकुंभ अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.