Pimple Nilkh : पिंपळेनिलख येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या निविदेत स्पर्धाच नाही

एकच निविदा प्राप्त; 16 कोटींचे कंत्राट बहाल; स्थायीची आयत्यावेळी मान्यता  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 पिंपळेनिलख येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी मागविलेल्या निविदेत निकोप स्पर्धाच झाली नाही. एकाच ठेकेदाराची निविदा प्राप्त झाली. फेरनिविदा न मागविता ठेकेदारावर मेहरबानी दाखवित 15 कोटी 58 लाख 96 हजार 830 रुपयांचा कंत्राट स्थायी समितीने आज (बुधवारी) आयत्यावेळी बहाल केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत विषयपत्रिकेवरील 17 विषयांना मान्यता दिली. तर, एक विषय तहकूब केला. तर, आयत्यावेळी 8 अशा 29 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 26 पिंपळेनिलख येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. 16 कोटी 64 लाख 90 हजार रुपये निविदा रक्कम होती. यामध्ये केवळ व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची एकच निविदा प्राप्त झाली. निविदेत स्पर्धाच झाली नाही. व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर यांची निविदा रकमेच्या 16 कोटी 64 लाख 90 हजार मधून रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्चेस वगळून 16 कोटी 55 लाख 21 हजारपेक्षा 6.4 टक्के कमी दराने आली आहे. ही निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने तसेच ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 26 जुलै 2019 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली.

व्ही.एम.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराकडून निविदा मंजूर दराने रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेसह 15 कोटी 58 लाख 96 हजार रुपयात काम करुन घेण्यात येणार आहे. ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.