Wakad: वॉकींग करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

Accused arrested for molesting walking woman

एमपीसी न्यूज – पती समवेत घराजवळ वॉकींग करत असताना दुचाकीवरून आलेल्या एका तरूणाने महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार वाकड येथील कस्पटे कॉर्नर येथे नुकताच घडला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हर्षल विकास भेगडे (वय 28, रा. पिंपळेनिलख) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या 8 जून रोजी पती समवेत घराजवळ वॉकींग करत होत्या.  त्यावेळी दुचाकीवरून पाठीमागून आलेल्या आरोपी हर्षल याने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लिल हावभाव करून त्यांचा विनयभंग केला.

वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.